Crime NewsLatest NewsMaharashtra

मुंबईत संतापजनक घटना: मुक-बधिर तरुणीवर लैंगिक अत्याचार; वडील अटकेत

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 20 वर्षीय मुक-बधिर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणात पोलिसांनी तिच्याच वडिलांना अटक केली आहे. डीएनए तपासणीत हा धक्कादायक निष्कर्ष समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मागील वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये उघडकीस आली होती. तरुणीने आपल्या आजीला पोटदुखीची तक्रार केली असता तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर रुग्णालयाने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

प्रारंभी तरुणी बोलण्यास तयार नव्हती, त्यामुळे तपासात अडचणी येत होत्या. पोलिसांनी तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. समुपदेशनानंतर पीडित तरुणीने तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान पोलिसांनी संशयित 17 जणांचे डीएनए नमुने घेतले. त्यात पीडितेच्या वडिलांचा डीएनए गर्भातील बाळाशी जुळल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मार्च ते सप्टेंबर 2025 या कालावधीत हा अत्याचार झाला असावा. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पीडितेला वैद्यकीय आणि कायदेशीर मदत दिली जात आहे.

पोलीस म्हणाले की, हा अत्यंत गंभीर गुन्हा असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button