AmravatiLatest News

अमरावती महानगरपालिकेची ‘प्लास्टिक जप्ती’ मोहीम: ‘अमर सोडा’ व ‘इंदौर जिलेबी’वर दंडात्मक कारवाई

अमरावती पर्यावरण संरक्षणासाठी आणि शहराच्या स्वच्छतेसाठी अमरावती महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी झोन क्र. १ अंतर्गत येणाऱ्या इतवारा बाजार परिसरात ही मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला.

२२ आस्थापनांची तपासणी; ‘अमर सोडा’ला ५ हजारांचा फटका

या मोहिमेदरम्यान पथकाने एकूण २२ प्रतिष्ठानांची सखोल तपासणी केली. बहुतांश ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसले; अनेक व्यापाऱ्यांनी कापडी, कागदी पिशव्या आणि ५१ मायक्रोनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिकचा वापर सुरू केल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले.

मात्र, तपासणी दरम्यान ‘अमर सोडा’ या आस्थापनामध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा व वापर आढळल्याने त्यांच्यावर ५,०००/- रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, ‘इंदौर जिलेबी कॉर्नर’ येथे कचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिन उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने त्यांना १,०००/- रुपयांचा दंड करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ६,००० रुपयांचा दंड या कारवाईतून वसूल करण्यात आला.

प्रशासकीय पथक आणि मार्गदर्शन

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि प्लास्टिक नोडल अधिकारी विनोद टांक यांच्या सूचनेनुसार पार पडली. या पथकात खालील अधिकाऱ्यांचा समावेश होता:

  • राजू डीक्याव (ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक, प्लास्टिक)
  • सचिन सैनी (स्वास्थ निरीक्षक)
  • निखिल खंगाळे, प्रवीण उसरे, एम. सैय्यद, परीक्षित गोरले, अनिकेत महल्ले, पार्थ हरमकर व रोहित हडाले.

महानगरपालिकेचे आवाहन:

“नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा. तसेच, प्रत्येक दुकानात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र डस्टबिन ठेवणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button