AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठात ज्ञानस्त्रोत केंद्राच्यावतीने माहिती साक्षरता वर्गाचे 5 फेब्राुवारी रोजी आयोजन

अमरावती :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्र व ईबीएससीओ इंटरनॅशनल आयएनसी यांाच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 फेब्राुवारी रोजी दुपारी 3 वाजता माहिती सक्षरता वर्गाचे आयोजन ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये करण्यात आले आहे.

               ज्ञानस्त्रोत केंद्राव्दारे दरवर्षी विद्यार्थी, वाचक आणि संशोधकांकरिता काही ऑनलाईन डाटाबेसेसची वर्गणी जमा केल्या जाते. विद्यापीठास वन नेशन वन सब्सक्रिप्शन योजनेंतर्गत 30 डाटाबेसेसचा अॅक्सेस मिळाला असून यामध्ये आयईईई एक्स्प्लोर  याही डाटाबेसेसचा समावेश आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयातील संशोधन प्रलेखांसोबत यामध्ये इतर आंतरशाखीय विषयाचे साहित्य देखील उपलब्ध आहे. सदर डाटाबेसेसचा संशोधनाकरिता महत्तम उपयोग व्हावा, याकरिता या माहिती साक्षरता वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आयईईई एक्स्प्लोर या डाबेसेसेसच्या सहाय्याने संशोधनास आवश्यक माहिती कशी शोधायची, त्याचा संशोधनात उपयोग कसा करायचा याचे प्रशिक्षण सदर माहिती साक्षरता वर्गामध्ये देण्यात येणार आहे. वेबिनारचा विषय रिसर्च स्मार्टर, नॉट हार्डर :  अॅन इन्ट्रोडक्शन टू आयईईई एक्ल्प्लोर असा असून सदर प्रशिक्षण अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील तसेच इतर शाखेच्या संशोधकांना अतिशय उपयोगी होणार असून सर्व शिक्षक, विद्यार्थी, वाचक आणि संशोधकांनी https://tinyurl.com/sgbau-5feb या लिंकवर क्लीक करून सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button