विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर… विविध स्पर्धांमध्ये भाग घेणा-या विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती (दि. 30.01.2026) – क्रीडा, सांस्कृतिक, आविष्कार, आव्हान, उत्कर्ष अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेणा-या व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संबंधित अधिका-यांनी प्रमाणित केलेल्या विद्याथ्र्यांच्या हिवाळी – 2025 विद्यापीठीय पर्यायी परीक्षांचे वेळापत्रक परीक्षा विभागाकडून जाहीर करण्यात आले असून, 16 फेब्राुवारी, 2026 पासून सदर परीक्षा घेण्यात येणार आहेत. सर्वसंबंधित विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, अमरावती जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची परीक्षा ही विद्याभारती महाविद्यालय (केंद्र क्र.126), अकोला जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (205), बुलडाणा जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची जी.एस. महाविद्यालय, खामगांव (301), यवतमाळ जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ (401), वाशिम जिल्ह्रातील विद्याथ्र्यांची परीक्षा आर.ए. महाविद्यालय, वाशिम (701) आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांची परीक्षा ही त्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावरील नमूद परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
एन.ई.पी. स्नातक अभ्यासक्रमाच्या काही व्हर्टीकल्सच्या परीक्षा ह्रा महाविद्यालयीन स्तरावर असल्यामुळे सर्वसंबंधित महाविद्यालयातील ज्या विद्याथ्र्यांचे अर्ज महाविद्यालयांनी पर्यायी परीक्षेसाठी अग्रेषित केलेत आणि संबंधित संचालक यांनी परीक्षा विभागाकडे पर्यायी परीक्षेकरिता शिफारस केले, अशा महाविद्यालयातील विद्याथ्र्यांची यादी सर्वसंबंधितांना पाठविण्यात आली असून या विद्याथ्र्यांची पर्यायी परीक्षा सुध्दा 16 ते 27 फेब्राुवारी, 2026 दरम्यान महाविद्यालय स्तरावर घेण्यात यावी. सदर विद्याथ्र्यांचे हिवाळी-2025 परीक्षेकरिता देण्यात आलेले परिक्षा क्रमांक व प्रवेश पत्र पर्यायी परीक्षेकरिता कायम राहतील. तसेच वेळापत्रक व परीक्षा केंद्रनिहाय रोललिस्ट सुध्दा संबंधितांना पाठविण्यात आलेली असून विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



