विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 च्या विद्याथ्र्यांच्या राहिलेल्या विषयांची पुनर्परीक्षा होणार ….. विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती (दि. 30.01.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 परीक्षेदरम्यान समकक्षतेमुळे दोन किंवा अधिक पेपर एकाच दिवशी आले होते. त्यामुळे विद्याथ्र्यांकडून प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने अशा विद्याथ्र्यांच्या राहिलेल्या विषयांच्या पुनर्परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. सर्वसंबंधित विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची परीक्षा ही विद्याभारती महाविद्यालय (केंद्र क्र.126), अकोला जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (205), बुलडाणा जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची जी.एस. महाविद्यालय, खामगांव (301), यवतमाळ जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ (401) या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. विद्याथ्र्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र तसेच परीक्षा क्रमांक हे पर्यायी परीक्षेकरिता कायम राहतील. यासंदर्भात विद्याथ्र्यांच्या माहितीकरिता वेळापत्रक व परीक्षा केंद्रनिहाय रोललिस्ट विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



