३५ फूट उंचीवर जीवघेणा ड्रामा; अकोला रेल्वे पोलिसांनी मृत्यूच्या जबड्यातून तरुणाला खेचले

दि. २४ जानेवारी २०२६ रोजी अकोला रेल्वे स्टेशनवर असा काही थरार घडला, जो पाहून पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.” “एक ३५ वर्षीय तरुण रेल्वे स्टेशनच्या ३५ फूट उंच ओव्हरब्रिजवर चढला. सुरक्षेसाठी लावलेल्या ८ फुटी जाळीच्या बाहेरून तो लटकत होता. खाली धावणाऱ्या रेल्वे गाड्या आणि बाजूलाच असलेली हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक वायर! तो तरुण कोणत्याही क्षणी खाली उडी मारणार, अशा स्थितीत अकोला रेल्वे पोलीस आणि RPF चे जवान तिथे पोहोचले.” “तब्बल एक तास पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती एवढी बिकट होती की, त्याला वाचवायला गेल्यास पोलिसांचाही जीव जाऊ शकला असता. पण पोलिसांनी डगमगून न जाता, आधी रेल्वेची वीज बंद केली आणि मग स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ८ फुटी जाळीवर चढून त्या तरुणाला सुखरूप आत ओढले.”(सम ारोप)“विजय भालेराव असे या तरुणाचे नाव असून, कौटुंबिक कलहातून त्याने हे पाऊल उचलले होते. सपोनि अर्चना गाढवे, निरीक्षक लक्ष्मण यादव आणि त्यांच्या पूर्ण टीमने दाखवलेल्या या शौर्याला आमचा सलाम!



