Latest NewsNagpur

नागपूर पोलीस आयुक्तालयामार्फत ‘टायगर रन’चे शानदार आयोजन

अंमली पदार्थांचे सेवन रोखा आणि शारीरिक सुदृढता राखा… याच उद्देशाने आज नागपूर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत ‘टायगर रन- रन फॉर ड्रग्ज, रन फॉर लाईफ’ या मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले.पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेला त्यांनी स्वतः हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. या स्पर्धेत २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा चार गटांचा समावेश होता.विशे ष म्हणजे, या मॅरेथॉनमध्ये केवळ वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा अंमलदारच नाही, तर त्यांचे कुटुंबीय आणि नागपूरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालय येथून सुरू झालेली ही धाव विविध मार्गांवरून फिरून पुन्हा मुख्यालयात उत्साहात संपन्न झाली. नागपूरला ड्रग्जमुक्त आणि फिट बनवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button