AmravatiCrime NewsLatest News

अमरावती : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 8 किलो गांजासह तरुण अटकेत

मा. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार अमरावती शहरात अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, गुन्हे शाखा, अमरावती शहर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने २५ जानेवारी २०२६ रोजी मोठी कारवाई केली. पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, एक इसम नागपूर–अमरावती एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या वडाळी सर्व्हिस रोडवर गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव योगेश उर्फ अजुबा धनराज रायकवार, वय २४ वर्ष, रा. रतनगंज, नागोबा ओटा जवळ, अमरावती असे आहे. त्याच्या ताब्यातून ८ किलो १०५ ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत १ लाख ६२ हजार १०० रुपये, तसेच एमआय कंपनीचा मोबाईल फोन, किंमत १० हजार रुपये असा एकूण १ लाख ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे आरोपीविरोधात एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल गुन्हे शाखा पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button