Crime NewsLatest NewsPune

सोन्याच्या दागिन्यांवरून पुण्यात पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पती अटकेत

दररोज वाढणाऱ्या सोन्याच्या भावांमुळे अनेक घरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत असतानाच पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात घडली. नम्रता शैलेंद्र व्हटकर असे मृत महिलेचे नाव असून शैलेंद्र व्हटकर असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता गेल्या काही दिवसांपासून पतीकडे सोन्याचे दागिने बनवून देण्याची मागणी करत होती. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

नेहमीच्या वाद आणि तणावाला कंटाळून आरोपी शैलेंद्रने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. त्याने पत्नी नम्रताला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले आणि तेथे धारदार चाकूने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नम्रता गंभीर जखमी झाली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे वाडेबोल्हाईसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, सोन्याच्या दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक तणावावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button