AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठात 28 व 29 जानेवारी रोजी ‘स्टार्टअप एक्स्पो’ चे भव्य आयोजन

अमरावती (दि. 22.01.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ, रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत येत्या 28 व 29 जानेवारी, 2026 रोजी ‘स्टार्टअप एक्स्पो 2026’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. विद्याथ्र्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देणे, उद्योजकता संस्कृती विकसित करणे या उद्देशाने सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनीमध्ये बेस्ट प्रोटोटाईप्स, बेस्ट अर्ली स्टेज स्टार्टअप्स, सोशल इन्नोव्हेशन अशा प्रकारचे शंभराहून अधिक स्टॉल्स राहणार असून त्यामध्ये विद्याथ्र्यांचे शोध, स्टार्टअप उत्पादने आणि संशोधनाचे प्रोटोटाइप मांडले जाणार आहेत.
                प्रदर्शनीचे उद्घाटन 28 जानेवारी रोजी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते होणार असून 29 जानेवारी रोजी समारोपीय समारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह येथे संपन्न होईल. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी आणि विद्यापीठातील विभागप्रमुख यांनी या प्रदर्शनीला भेट द्यावी व विद्याथ्र्यांना सहभागी होण्याकरीता पाठवावे. तसेच सहभागी होण्यासाठी https://forms.gle/WUS4UjLRU4D8ooLC6 या लिंक वर नोंदणी करावी व या दोन दिवसीय प्रदर्शनीमध्ये मोठ¬ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button