Amaravti GraminLatest NewsSocial News

बडनेरा येथील बेघरांच्या मदतीला धावले मुंबईचे उद्योजक जवारीलाल जैन; ‘आधार केंद्रा’ला दरमहा ३० हजार रुपयांचे अन्नदान जाहीर

बडनेरा (अमरावती): ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हा मंत्र जपत मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मा. श्री जवारीलाल सी. जैन यांनी बडनेरा येथील बेघर निवारा व आधार केंद्रासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जे. सी. जैन चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने या केंद्रातील निराधार बांधवांसाठी दरमहा ३०,०००/- (तीस हजार) रुपयांचा किराणा खर्च (अन्नदान) देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

या औचित्याने आधार केंद्र परिसरात एका छोटेखानी ‘ऋणानुबंध’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे प्रसिद्ध उद्योजक श्री चंद्रकुमार जाजोदिया (लप्पी भैय्या) आणि अमरावतीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. पंडित देवदत्त शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

सेवेचे कौतुक आणि भविष्यातील आधार

कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांनी आधार केंद्रातील बेघर बांधवांची अहोरात्र सुश्रुषा करणाऱ्या व्यवस्थापिका ज्योती राठोड यांच्या कार्याची विशेष प्रशंसा केली. पंडित देवदत्त शर्मा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आपण सर्वजण मिळून करत असलेले हे कार्य खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आहे. भविष्यात केंद्राला कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहू.”

१५ वर्षांच्या प्रामाणिक कार्याची पावती

उद्योजक श्री लप्पी भैय्या यांनी आपल्या भावना व्यक्त करताना व्यवस्थापनाचे कौतुक केले. ते म्हणाले, “मी मागील १५ वर्षांपासून या केंद्राचे कार्य अतिशय जवळून बघत आहे. ज्योती राठोड आणि त्यांची टीम अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. आगामी काळात समाजातील अधिक मोठ्या दानशूर व्यक्तींना या केंद्राशी जोडून हे कार्य अधिक व्यापक करूया.”

कार्यक्रमाचा सर्वात भावूक क्षण तेव्हा आला जेव्हा श्री लप्पी भैय्या यांनी केंद्रातील सर्व निराधार बांधवांना साष्टांग नमस्कार करून त्यांचे वंदन केले.

उपस्थित मान्यवर

या सामाजिक उपक्रमाला श्री राजन आडतिया, व्यवस्थापिका ज्योती राठोड, संचालक राजीव बसवनाथे, काळजीवाहक विलासभाऊ थोरात यांच्यासह केंद्रातील निवारावासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button