सर्व विद्या आत्मसात करा, स्वत:ला घडवा – डॉ. शरद निंबाळकर यांचे युवकांना आवाहन

विद्यापीठात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा संमेलन उत्साहात
अमरावती : एक माणूस काय करू शकतो, हे विविध उदाहरणांव्दारे पटवून देतांना विद्या आत्मसात करा, स्वत:ला घडवा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी युवकांना केले. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो, त्यानिमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संमेलनाचे उद्घाटनीय भाषण करतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे, मुंबई येथील स्वामी विवेकानंद तत्वज्ञानाच्या अभ्यासक तथा समाजसेविका श्रीमती श्रध्दा व्यास, श्रीरामकृष्ण विवेकानंद समितीचे अध्यक्ष श्री हरिहर जिराफे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. योगे·ार कुरवाडे उपस्थित होते.
डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, स्वामी विवेकानंद म्हणजे आत्मवि·ाास, चारित्र्य आणि ज्ञानाचा समूह होय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचा वनवास संपविला आणि आज महिला सर्वोच्च पदावर आसनस्थ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानरुपी पुस्तकातून प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केले. त्यामुळे एक माणूस काय करु शकतो, हे स्पष्ट होते आणि विद्याथ्र्यांनो, स्वत:ला कमी लेखू नका. युरोपीय देशांमध्ये सुध्दा महिलांचा वनवास संपलेला नव्हता, त्यांनाही त्यांच्या अधिकारासाठी लढा द्यावा लागला. प्रज्ञा हा बुध्दीच्या पलिकडे मनाचा आविष्कार आहे. त्यामुळे कधीही स्वत:ला दुर्बल समजू नका. स्वत:ला घडवा, त्यासाठी तसे तयार करा. ई·ार सुध्दा सत्पुरुषचरणी लीन होतो, असे सांगून जेव्हा सर्व एकदिलाने ऐकतील तेव्हा न्याय प्रतिष्ठीत होईल, असेही डॉ. निंबाळकर म्हणाले.
प्रमुख अतिथी डॉ. मनिषा कोडापे म्हणाल्या, स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून प्रेरणा मिळते. अपयशाला घाबरू नये, कारण तेच यशाची पहिली पायरी सुध्दा असते. त्यामुळे विद्याथ्र्यांनी स्वत:मधील आत्मवि·ाास जागवा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
श्रीमती श्रध्दा व्यास म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांच्या जीवनातही गुरूंचे मोठे स्थान आहे. एकाग्रता कशी महत्वाची आहे, हे त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील ग्रंथालयाचे उदाहरण देवून स्पष्ट केले. एकाग्रतेनंतरची क्रिया म्हणजे समाधी होय. स्वामी विवेकानंद जेव्हा इतरांना देव पाहिला का असे जेव्हा विचारायचे, तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांचे नाव सांगितले आणि प्रत्येकामध्ये देवत्व असल्याचे सांगून आत्मतत्वच आत्मतत्वाला साद घालीत असतो, असेही त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय भाषणातून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकतांना नागपूर येथील रामकृष्ण परमहंस मठाच्या विद्याथ्र्यांचे उदाहरण दिले व स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने विद्याथ्र्यांना मोठी प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
संत गाडगे बाबा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी, सूत्रसंचालन श्री श्रीकृष्ण पखाले यांनी, तर आभार प्रा. योगे·ार कुरवाडे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



