AmravatiLatest NewsSocial News

राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेडमध्ये विद्यापीठाचे रासेयो स्वयंसेवक सहभागी होणार

अमरावती : 26 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे होणा­या प्रजासत्ताक दिन परेडकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे आठ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
                महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, रासेयो कक्षाच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेड निवड चाचणीमधून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आठ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी विज्ञान महाविद्यालय वरूडचा गितेश आगरकर, जी. एस. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगांवचा ओम वाकुडकर, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणाचा कृष्णा मोरे, श्री. आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा सचिन साबळे, बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय यवतमाळची कु. मैथीली सरोदे, प्रो.राम मेघे इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट महाविद्यालय, बडनेराची कु. सलोनी भट्ट, पंकज लध्दड इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट स्टडिज बुलडाणाची कु. राजेश्वरी आसोले व श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोलाची कु. हेमलता पवार या स्वयंसेवक विद्याथ्र्यांचा समावेश आहे. सर्व स्वयंसेवक विद्याथ्र्यांचे राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेडच्या संघात स्थान मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरुन त्यांचे कौतूक होत आहे.
                 विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी स्वयंसेवकांची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेडमध्ये निवड झाल्याबद्दल सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन व भरभरुन कौतूक केले. तसेच प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू यांनीही सर्व स्वयंसेवक विद्याथ्र्यांचे भरभरुन कौतूक करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button