AmravatiLatest News

राज्यस्तरीय उत्कर्ष स्पर्धेत विद्यापीठाच्या रासेयो चमुची उत्कृष्ठ कामगिरी …. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचेहस्ते विद्याथ्र्यांचा सत्कार

अमरावती :  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्षव्दारा राज्यस्तरीय उत्कर्ष – सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने उत्कृष्ट कामगिरी करीत संकल्पना नृत्य, समुहगान व उत्कृष्ट कार्य भित्तीचित्र अहवाल या कलाप्रकारामध्ये तीन पारितोषिके प्राप्त केली आहेत. विद्यापीठाच्या चमूने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व चमू व व्यवस्थापकांचा सत्कार केला.
                सदर महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे नुकताच पार पडला. या महोत्सवामध्ये महाराष्ट्रभरातील 22 विद्यापीठांमधून 304 स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते. त्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा गजानन पळसकर, जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापूरचा सार्थक गावंडे, श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जीचा अभिषेक धर्मे, सिताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा हर्षल गवई, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकालचा अभिषेक कातव, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणाचा संकेत बागडे, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळचा तुषार उके, आर.ए. कॉलेज वाशिमचा महेश राठोड व ऋषिकेश कोंडाणे, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट बडनेराची कु. आर्या जामोदकर, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची कु. जान्हवी शेटे, श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जीची कु. तृप्ती खरात, श्री. आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. यशिका प्रांजळे, पायल भगत, विज्ञान महाविद्यालय, मलकापूरची कु. वृषाली गायकवाड, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीची कु. ऋतुजा रामगीरवार, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसदची कु. राजेश्वरी गजरे, ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. नियती काळे असे  18 स्वयंसेवक, तर चमू व्यवस्थापक म्हणून जिजामाता महाविद्यालय, बुलडाणाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गजानन लोहटे सहभागी झाले होते.सदर स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या रासेयो स्वयसेवकांनी आठ सामाजिक व सांस्कृतिक कलाप्रकारांपैकी संकल्पना नृत्य, समूहगान व उत्कृष्ट कार्य भित्तीचित्र अहवाल या कलाप्रकारामध्ये तीन पारितोषिके प्राप्त केली आहेत.
                  कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व स्वयसेवकांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू यांनीही सर्वांचे भरभरुन कौतूक करुन शुभेच्छा दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button