विद्याथ्र्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा – अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे

विद्यापीठात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
अमरावती : महापुरुषांचे विचार नवीन पिढीला दिशादर्शक असतात. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचार व कार्यापासून विद्याथ्र्यांनी आदर्श घेवून आपल्यातील कला, कौशल्य व व्यक्तीमत्व विकसित करावे, असे प्रतिपादन मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात करण्यात आले, उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजक तथा आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा डॉ. मोना चिमोटे यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांसारखा महान सुपूत्र घडविला. सर्वगुण संपन्न शिवराय आज आम्हां सर्वांचे आदर्श आहेत. महाराजांना राजमाता जिजाऊंनी सर्व कौशल्ये व विद्यांमध्ये पारंगत केले. त्यांनी आपल्या राज्य कारभारात स्त्रियांचा सन्मान केला, त्यांना समान संधी दिली. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांचे स्मरण जयंतीप्रसंगी होत आहे. स्वामी विवेकानंद यांनी दिलेले विचार हे युवकांसाठी प्रभावी असून त्यातूनच युवक बलशाली होवू शकतो. विद्याथ्र्यांमधील कलागुण व व्यक्तीमत्व विकसित व्हावे, यादृष्टीने आयोजित वक्तृत्व स्पर्धा निश्चितच विद्याथ्र्यांना उपयुक्त ठरणार असून आपल्यातील उपयुक्तता या स्पर्धेच्या निमित्ताने युवक सिद्ध करतील, असे सांगून त्यांनी जयंतीदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
प्रमुख अतिथी डॉ. नितीन कोळी म्हणाले, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, हा उपदेश राजमाता जिजाऊ यांनी दिला. त्यांनी राज्य कारभार करतांना सर्वांना समानतेची वागणूक दिली. सर्व जाती-धर्म-पंथांच्या लोकांना समान मानले आणि म्हणूनच शिवाजी महाराज इतिहास घडवू शकले, आदर्श राजा झाले आणि त्यांचा आदर्श आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीप्रसंगी ‘जिजाऊ लेक’ हा पुरस्कार देवून महिलांचा सन्मान केल्या जातो, ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे. याप्रसंगी त्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
‘जिजाऊ लेक’ पुरस्काराने डॉ. स्वाती शेरेकर सन्मानित
इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर यांचा आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे यावर्षी ‘जिजाऊ लेक’ हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी व अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी गौरव प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून त्यांना सन्मानित केले. याप्रसंगी बोलतांना डॉ. स्वाती शेरेकर म्हणाल्या, पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल व पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानते. विद्याथ्र्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी दिलेले विचार पुढे न्यावेत आणि त्यांचा आदर्श सदैव आपल्या मनात ठेवावा, असे सांगून त्यांनी इन्क्युबेशन सेंटरद्वारे चालविल्या जाणारे विविध उपक्रम, मिळालेले अनुदान आदींची माहिती दिली. स्टार्टअप सुरु करण्याकरीता विद्याथ्र्यांनी सेंटरला भेट द्यावी व आपले स्टार्टअप सुरु करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकतेतून संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजनामागील भूमिका विषद केली. सर्व युवक व युवतींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कृतीशील विचार आत्मसात करावे आणि देश विकासामध्ये आपले योगदान द्यावे, असे सांगितले. विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजमाता जिजाऊ, संत गाडगे बाबा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेकरीता असलेले परीक्षक डॉ. वैभव म्हस्के, प्रा. अभिजित इंगळे, प्रा. पुजा अलोणे, डॉ. मनिषा इंगलकर, श्री प्रफुल्ल कुबडे तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. संचालन प्रा. आदित्य पुड यांनी, तर आभार प्रा. अनघा देशमुख यांनी मानले. प्रा. रोहिणी वावरे यांनी डॉ. स्वाती शेरेकर यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



