AmravatielectionLatest Newspolitics

प्रभाग ६ ‘ड’ मध्ये निवडणुकीची रंगत वाढली; युवा स्वाभिमानीचे उमेदवार दीपक साहूंना जनतेचा वाढता प्रतिसाद

अमरावती

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा ‘ड’ मध्ये राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे. युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार दीपक किसनराव साहू उर्फ सम्राट यांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र मोरबाग परिसरात स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली जनता ही बदलाची नांदी मानली जात आहे.

प्रभाग क्रमांक सहा ‘ड’ अंतर्गत येणाऱ्या विलास नगर मसा, मोरबाग आणि संपूर्ण परिसरात दीपक साहू यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. घराघरांतून नागरिक स्वतःहून बाहेर पडत प्रचारात सहभागी होत असून परिसरात “सम्राट” यांच्या नावाचा जोरदार गजर ऐकायला मिळत आहे. प्रचार फेऱ्यांदरम्यान युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, माजी खासदार नवनीत राणा यांच्या जाहीर सभेनंतर प्रभागातील राजकीय वातावरणात लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येत आहे. ज्या मतदारसंघात पूर्वी आमदार रवी राणा यांचा प्रभाव मानला जात होता, त्या ठिकाणी आता युवा स्वाभिमानी पक्षाचे ‘पाना’ चिन्ह थेट दीपक साहू यांच्या हातात जात असल्याचे चित्र दिसत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, प्रभागाच्या विकासासाठी तरुण, सक्षम आणि स्थानिक नेतृत्वाची आवश्यकता आहे. विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची क्षमता दीपक साहू यांच्यात असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.

मोरबाग प्रभागात युवा स्वाभिमानी पक्षाचा पहिला नगरसेवक म्हणून दीपक साहू निवडून येण्याची शक्यता आता अधिकच बळावताना दिसत असून, प्रचाराच्या प्रत्येक फेरीत मिळणारा वाढता जनसमर्थन त्याचीच साक्ष देत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button