AmravatiLatest Newspolitics

विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरतर्फे स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक.. रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशनकडून 7 स्टार्टअप्सला 52 लाखांचा सीड फंड

 अमरावती (दि. 07.01.2026) – केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या निवड प्रक्रियेमध्ये 7 स्टार्टअप्सची अंतिम निवड करण्यात आली. या स्टार्टअप्सना एकूण 52 लाख रुपयांचा सीड फंड प्रदान करण्यात येत आहे. या आर्थिक सहाय्यामुळे नवउद्योजकांना उद्योगउभारणी, संशोधन विकास, उत्पादन सुधारणा आणि व्यवसाय विस्तारासाठी भक्कम आधार मिळणार असून, रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे.
               संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन ही एक स्वतंत्र सेक्शन 8 कंपनी असून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे मार्गदर्शन आणि प्रा. स्वाती शेरेकर यांच्या देखरेखीखाली सदर इन्क्युबेशन सेंटर अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. विद्यापीठाच्या  इन्क्युबेशन सेंटरला स्टार्टअप इकोसिस्टमच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून 5 कोटी रुपये, डीएसटी आय-टीबीआय कडून 5 कोटी रुपये आणि स्टार्टअप इंडिया सीड फंडकडून 2.62 कोटी रुपये असा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून नवउद्योजकांना तांत्रिक, आर्थिक आणि धोरणात्मक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
                महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी अंतर्गत स्टार्टअप्सना सीड फंडिंग देण्यासाठी कोहॉर्ट-1 व 2 चे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पात्र ठरलेल्या स्टार्टअप्सची निवड करुन त्यांना भांडवल सहाय्य पुरविण्यात येत आहे. याशिवाय इन्क्युबेशन सेंटर केवळ मार्गदर्शन व संशोधन सुविधा पुरविण्यापुरते मर्यादित  न ठेवता उद्योजकतेला आवश्यक तांत्रिक मदत, मार्गदर्शन, उद्योग क्षेत्राशी जोडणी आणि आर्थिक पाठबळ पुरवून स्टार्टअप इकोसिस्टम बळकट करण्याचे महत्वाचे कार्य करीत आहे. विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी, नवउद्योजकांमध्ये नवकल्पनांना नवी दिशा मिळत असून प्रदेशातील उद्योगविकासाला नवी ऊर्जा मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button