AmravatielectionLatest Newspolitics

प्रभाग १७ मध्ये भाजपाची भव्य जाहीर सभा; बावनकुळे यांचे उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

अमरावती

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत आज प्रभाग क्रमांक १७ मधील गळगळेश्वर रवी नगर येथे भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा पार पडली. राज्याचे महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रचाराला वेग दिला असून, या जाहीर सभेसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला संबोधित करत भाजपाच्या अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी भाजपाच्या अधिकृत उमेदवार सुनंदा विनोदराव खरड, मोनाली तुषार चौधरी, आशिष बबनराव आतकरे तसेच भाजपा पुरस्कृत उमेदवार संतोष देवमन खेडेकर (एसी निशाणी) यांना विजयी करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले.

सभेदरम्यान अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा विकास आराखडा जनतेसमोर मांडण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, रोजगार, महिला सक्षमीकरण यांसह शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी दोन्ही हात उंचावून भाजप उमेदवारांना पाठिंबा दर्शवत विजयाचा निर्धार व्यक्त केला. एकूणच या जाहीर सभेमुळे प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपाचा प्रचार अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button