AmravatielectionLatest Newspolitics

प्रभाग १४ मध्ये भाजपाची भव्य पदयात्रा; चारही उमेदवारांचा घराघरांत प्रचार

अमरावती

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असून, आज जवाहर गेट बुधवारा परिसरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भाजपाचे चारही उमेदवार एकत्र सहभागी होत घराघरांत जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेताना दिसले.

गुरुवारी सकाळपासून सातखिराडी ते बसेश्वर चौक परिसरात ही पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक रिंगणात असलेले
अ वर्ग – अविनाश देऊळकर,
ब वर्ग – सुनीता बुरंगे,
क वर्ग – गंगा खारकर,
ड वर्ग – विवेक कलोती

हे चारही उमेदवार एकत्रितपणे या प्रचारात सहभागी झाले होते.

पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या घरांना भेटी देत थेट संवाद साधला. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत भाजपाने आतापर्यंत केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली. तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबतही मतदारांशी संवाद साधण्यात आला.

या पदयात्रेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि मूलभूत सुविधा हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून भाजपाने मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

या भव्य पदयात्रेमुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रचाराला नवचैतन्य मिळाले आहे. एकूणच, जवाहर गेट बुधवारा प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपाची ही पदयात्रा लक्षवेधी ठरली असून, चारही उमेदवारांनी एकत्र येत आपली ताकद दाखवून दिली आहे. आता मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button