एम.बी.ए. विभागाच्या तीन विद्यार्थीनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

अमरावती (दि. 08.01.2026) – संत गाडगे बाबा अमरवती विद्यापीठातील मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.) विभागाच्या तीन विद्यार्थीनी कु. मोहिनी संजय राऊत, कु. नेहा गजानन वासू आणि कु. हर्षाली शरद पाचगडे यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. समर्पित अभ्यास, शिस्तबध्द जीवनशैली आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर या विद्यार्थीनींनी हे यश संपादन केले आहे.
कु. मोहिनी राऊत ही इन्फ्रिजीडेट इंजिनिअर्स इंडिया प्रा.लि., अमरावती येथे एक्झिक्युटिव्ह अकाऊंटंट म्हणून, कु. नेहा वासू ही ई.एस.ए.एफ. स्मॉल फायनान्स बँक लि. येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह, तर कु. हर्षाली पाचगडे ही डव्ह गारमेंट्स प्रा.लि., अमरावती येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे तसेच एम.बी.ए. विभागप्रमुख डॉ. दीपक चाचरकर यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.



