AmravatiLatest Newspolitics

प्रभाग क्रमांक ६ मध्ये दीपक ‘सम्राट’ साहू यांच्या प्रचाराने वेधले लक्ष; इतवारा बाजारात भव्य रॅली

अमरावती

अमरावती महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली असून प्रत्येक प्रभागात प्रचाराला वेग आला आहे. अशातच प्रभाग क्रमांक ६ मध्ये युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार दीपक साहू उर्फ सम्राट यांच्या प्रचाराने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इतवारा बाजार परिसरात काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीत विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून युवा स्वाभिमानी पक्षाच्या वतीने दीपक साहू उर्फ सम्राट यांच्या प्रचारासाठी आज इतवारा बाजार येथे जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच विजयाचा आनंद साजरा करत कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप करण्यात आले. यावेळी हेमराज साहू यांनी नागरिकांना लाडू वाटत, “दीपक सम्राट यांचा विजय निश्चित असून प्रभाग क्रमांक सहामध्ये परिवर्तन होणारच,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या जाहीर सभेनंतर मोरबाग, विलासनगर, गवलीपुरा, इतवारा बाजार आणि मसानगंज परिसरात दीपक सम्राट यांच्या समर्थनात वातावरण तयार झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येतील उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रचार पाहता प्रभाग क्रमांक ६ मध्ये दीपक सम्राट यांच्या विजयाच्या शक्यता बळावल्याचे सध्याचे चित्र आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button