Latest NewsNagpurSocial News

पोलीस वर्धापन सप्ताहानिमित्त अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम; शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर

२०२६ महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहाच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिघल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू तसेच नागरिकांच्या जीविताला धोका ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजा यांच्या नष्टीकरणासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. लहान वयातच कायद्याची माहिती मिळावी, अवैध गोष्टींचे दुष्परिणाम समजावेत आणि समाजातील जबाबदार नागरिक घडावेत, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

२०२६ महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहानिमित्त शहर पोलीस दलाकडून सामाजिक जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अवैध दारू आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा यांचे नष्टीकरण प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्यात आले.

या संपूर्ण मोहिमेबाबत माहिती देताना डीसीपी निकेतन कदम यांनी सांगितले की, अवैध दारू आणि नायलॉन मांजा हे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर अनेक वेळा गंभीर अपघात आणि जीवितहानीचे कारण ठरतात. अशा कारवायांद्वारे पोलीस केवळ गुन्हे रोखण्याचे काम करत नाहीत, तर समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारीही पार पाडतात.

पोलीस वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या अशा जनजागृती आणि कारवाई मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button