Crime NewsLatest NewsNagpur

नागपूरमध्ये नायलॉन मांजाविरोधात मोठी कारवाई; १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

नागपूर

नागपूर शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. युनिट ०५ गुन्हे शाखेने वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकत तब्बल १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत युनिट ०५, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि. ६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.२० ते ८.२० या वेळेत प्रधानमंत्री आवास योजना, बिल्डींग क्रमांक ४९ समोर छापा टाकण्यात आला. या कारवाईत मनीष राजेश कठाणे (वय १९), रा. प्रधानमंत्री आवास योजना, वाठोडा, नागपूर याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून शासनाने प्रतिबंधित केलेला MONO KITE लेबल असलेला नायलॉन मांजा – २१ चक्री, एक दुचाकी, एक मोबाईल फोन तसेच नायलॉन मांजाच्या विक्रीतून मिळालेले १ हजार ५०० रुपये रोख असा एकूण १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत.

दरम्यान, राहील शेख, रा. पारडी, नागपूर हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button