AmravatiLatest NewsSocial News

आहार प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …. विद्यापीठातील गृह विज्ञान विभाग व झेनिथ हॉस्पिटलचे संयुक्त आयोजन

अमरावती (दि. 06.01.2026) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृहविज्ञान विभाग व अमरावती शहरातील प्रसिध्द झेनिथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथे हृदयरोगांसाठी आरोग्य कार्यक्रमांतर्गत आहार प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनीमध्ये गृहविज्ञान विभागाच्या विद्याथ्र्यांनी आहाराविषयी विविध मॉडेल व पोस्टरव्दारे आहाराविषयी नागरिकांना जागरुक केले.
ह्मदय रुग्णांनी कोणते पदार्थ सेवन करावेत, कोणते टाळावेत, प्रक्रिया केलेले अन्न, मैद्याचे पदार्थ, बिस्किटे, शीतपेयांचे दुष्परिणाम, मीठ, साखरेचे अति सेवन टाळण्याचे महत्त्व विद्यार्थिनींनी प्रभावीपणे सांगितले. त्याचबरोबर प्रथिने, फायबरयुक्त अन्नपदार्थ, कडधान्ये, फळे, पालेभाज्या व धान्यांचा समावेश केल्यास आरोग्य व ह्मदयावर होणारे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष मॉडेल्सद्वारे नागरिकांना पटवून देण्यात आले. तळलेले पदार्थ, फास्टफुड, मैदा, बिस्किटे, साखरयुक्त शीतपेये, प्रक्रिया केलेले मांस व जंकफुड यांचे अतिसेवन ह्मदय व आरोग्यास कसे हानिकारक ठरते, याची माहिती नागरिकांना देतांना अन्नगटांची ओळख, फुड पिरॅमिडचे महत्त्व, दैनंदिन आहारात भाज्या, फळे, धान्ये व प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश कसा करावा, तेल, साखर, जंकफुडचे मर्यादित सेवन का आवश्यक आहे याविषयी सुध्दा मार्गदर्शन करण्यात केले.
आहार प्रदर्शनीला किशोरवयीन मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांनी भेट दिली. कार्यक्रमासाठी गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता विभागातील शिक्षक आयतल कामदार, भक्ती सोंदिया, सुमेध वडूरकर तसेच झेनिथ हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ काजल केशवानी, किरण ठाकरे, समृध्दी वानखडे यांचे सहकार्य लाभले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button