AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात ‘निसर्ग असमतोल व पर्यावरण संवर्धन’ विषयावर व्याख्यान संपन्न

अमरावती (दि. 02.01.2026)- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात ‘निसर्ग असमतोल व पर्यावरण संवर्धन’ विषयावर नुकतेच अतिथी व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख डॉ. के.बी. नायक, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. के. यू. राऊत, मार्गदर्शक म्हणून जवाहर नवोदय विद्यालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल श्री नारायण पवार उपस्थित होते.
श्री पवार यांनी व्याख्यानातून निसर्गातील असमतोलाची कारणे, मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे पर्यावरणीय प्रश्न तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विषद केले. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक व्यक्तीने त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले. व्याख्यानातून पर्यावरणीय असमतोल, त्याची कारणे व उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
                व्याख्यानानंतर श्री नारायण पवार यांनी तयार केलेल्या बीज बँकेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यात स्थानिक व दुुर्मिळ वनस्पतींच्या विविध बियाण्यांचा समावेश होता. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी बीज बँकेचे महत्त्व प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे स्पष्ट करण्यात आले. तसेच काही बियाण्यांची समाजशास्त्र विभागाच्या परिसरात प्रात्यक्षिक स्वरुपात लागवड करण्यात आली.
                अध्यक्षीय भाषणात डॉ. के.बी. नायक यांनी पर्यावरण संवर्धनाचे समाजशास्त्रीय अभ्यासातील अनन्यसाधारण महत्त्व सांगितले. पर्यावरण संवर्धन व शाश्वत विास यांचा परस्परसंबंध स्पष्ट करतांना विद्याथ्र्यांनी संशोधनवृत्ती वाढवावी, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत भगत, तर आभार डॉ. रोहिणी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला विभागातील प्रा. साधना इंगोले, डॉ. रोहिणी वावरे, संशोधक विद्यार्थी राजकुमार सरयाम, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री प्रवीण गडलिंगकर, विद्यार्थी व संशोधक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button