Latest NewsSocial News

डोंगरखर्डा येथे श्री संत जटाजी महाराजांची पुण्यतिथी यात्रा व दहीहंडी उत्साहात साजरी

कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात श्री संत जटाजी महाराजांची पुण्यतिथी यात्रा तसेच दहीहंडी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.

सकाळी घटस्थापना व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर दिवसभर संत जटाजी महाराजांच्या चरणी भाविकांनी दर्शन व पूजा अर्पण केली. सायंकाळी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भजनांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात भक्तिरसाची अनुभूती मिळाली.

श्री संत जटाजी महाराजांच्या चरणपूजन व आरतीनंतर नामदेवराव गेडाम, शामराव दहले आणि किशोर सहापायले यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा पार पडला. या दिंडीत बाहेरगावाहून आलेल्या दिंड्यांनीही सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाच्या समारोपानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री ना. अशोकराव उईके, सरपंच नंदाताई उईके, उपसरपंच निछल ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

संपूर्ण उत्सव शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारी श्री संत जटाजी महाराजांची पुण्यतिथी यात्रा व दहीहंडी उत्सव भाविकांसाठी भक्ती व समाधान देणारा ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button