AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाच्या हिवाळी-2025 लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर… विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती (दि.31.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 सर्व लेखी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या ध्र्ध्र्ध्र्.द्मढ़डठ्ठद्व.ठ्ठड़.त्द या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील बी.कॉम. एल.एल.बी. सेमि.-1 (फाईव्ह इयर्स टेन सेमिस्टर्स इंटीग्रेटेड कोर्स) आणि अॅडव्हान्स डिप्लोमा इन कौन्सिलिंग अॅन्ड सायकोथेरेपी सेमि.-1, 2 व 3 (एन.ई.पी.) या परीक्षांच्या वेळापत्रकात दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येत असून विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात येत आहे.
               यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button