Latest NewsMaharashtra

नववर्षात सुरक्षित अन्नासाठी विशेष मोहीम

अमरावती जिल्ह्यात FDA कडून ‘नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ तपासणी अभियान
अमरावती | जिमाका | 31 डिसेंबर

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागामार्फत अमरावती जिल्ह्यात ‘नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान 24 डिसेंबरपासून सुरू झाले असून 10 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

हॉटेल, उपहारगृहे, क्लब हाऊसची कसून तपासणी

या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल्स, उपहारगृहे, क्लब हाऊस, रिसॉर्ट्स तसेच इतर अन्नविक्री करणाऱ्या आस्थापनांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, यावर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.

अन्न व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन व कार्यशाळा

तपासणीबरोबरच संबंधित आस्थापना चालक आणि अन्न व्यावसायिकांसाठी सुरक्षित अन्नाच्या सवयी, नियम आणि कायदेशीर बाबी याबाबत सभा व कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नियमांचे पालन करूनच अन्न विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने केले आहे. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button