विद्याथ्र्यांनो ! आपल्या नवकल्पानांना प्रत्यक्षात उतरवा – कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे

विद्यापीठात ‘आविष्कार’ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन, नवसंशोधक विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सचे सादरीकरण
अमरावती – (दि. 30.12.2025) संशोधनासाठी अनेक क्षेत्रे खुली आहेत. विद्याथ्र्यांनी आपल्या मनातील नवकल्पनांना केवळ विचारांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. ‘अविष्कार’ स्पर्धा हे अशा सर्जनशील विचारांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विद्याथ्र्यांनी आपले संशोधन समाजासाठी उपयुक्त कसे ठरेल, याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील अविष्कार सेल तर्फे आयोजित विद्यापीठ स्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा करुन डॉ. विनायक देशपांडे पुढे म्हणाले, तत्कालीन कुलपती कृष्णा यांनी ही स्पर्धा महाराष्ट्रात सुरू केली आणि त्यानंतर या उपक्रमाला मिळालेली गती यामुळे महाराष्ट्रातील विद्याथ्र्यांच्या कल्पकतेला मोठी चालना मिळाली आहे. आजच्या तरुणांकडे संशोधनात्मक कल्पनांची कमतरता नाही, गरज आहे ती कठोर परिश्रमांची आणि सातत्याची. संशोधन हे केवळ पीएच.डी. मिळवण्यापुरते मर्यादित नसावे, तर त्यातून दर्जेदार जीवन जगण्यासाठी मार्ग सुकर व्हावा, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी एलन मस्क यांच्या यशाचे उदाहरण देतांना सूक्ष्म निरीक्षण आणि समाजाच्या गरजा ओळखून संशोधन करण्याचे आवाहन केले. तसेच बिहारमधील मोहम्मद सैदुल्ला यांनी नदी ओलांडण्यासाठी तयार केलेल्या ‘पाण्यावर चालणा-या सायकल’चा दाखला देत, गरज हीच संशोधनाची जननी असल्याचे स्पष्ट केले.एरोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बाबत बोलताना ते म्हणाले की, तंत्रज्ञान मानवाची जागा घेऊ शकत नाही, परंतु ते मानवी कामे अधिक सुलभ करते. विद्याथ्र्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग करावेत.
कार्यक्रमात डॉ. प्रवीण उपरे यांनी दक्षिण कोरियातून ऑनलाइन माध्यमातून विद्याथ्र्यांशी संवाद साधला. त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे ‘संशोधन विषयाची निवड’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कोअर नॉलेज आणि लॅब स्किल्स : संशोधनासाठी मूलभूत ज्ञान आणि प्रयोगशाळेतील कौशल्ये किती महत्त्वाची आहेत, हे त्यांनी पटवून दिले. विद्याथ्र्यांनी स्वतःमधील कौशल्ये ओळखून, समाजाला फायदेशीर ठरेल अशा विषयांत करिअर करावे, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ संशोधन करून चालणार नाही, तर ते जगासमोर मांडण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संशोधन व नवोपक्रम हा अर्थव्यवस्थेचा कणा-कुलगुरू
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, शेतकरी आत्महत्येसंदर्भात विद्यापीठाने संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे व या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्येच्या घटनांना कमी करण्याचे प्रयत्न होतील. आविष्कार हा राज्यपाल अभिमित प्रकल्प आहे व राज्यभरातील कुलगुरूंच्या होणा-या सभांमध्ये राज्यपालांकडून आविष्कारची आवर्जून माहिती घेतली जाते. त्यामुळे आविष्कार हा संशोधनाचा उत्सव असून कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा संशोधन व नवोपक्रम हाच आहे. त्यामुळेच हा प्रकल्प राज्यभरात सुरू करण्यात आला आणि ज्या देशांना आपण प्रगत राष्ट्र असे संबोधतो, त्यां देशांच्या विकासामागे संशोधन, नवोपक्रम आहे. भारतातही आता संशोधन आणि नवोपक्रमाला मोठ¬ा प्रमाणात वाव मिळत असून भारताची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू आहे व यात विद्याथ्र्यांची जबाबदारी सुध्दा अधिक वाढली आहे. उद्याचे भविष्य हे विद्यार्थीच असल्याने ही जबाबदारी विद्याथ्र्यांनी स्वीकारावी. विद्यापीठस्तरीय आविष्कारमधून राज्यस्तरावर जाणा-या विद्याथ्र्यांना शुभेच्छा देतांना ज्यांची निवड होणार नाही, त्यांनी निराश न होता आपल्या संशोधनाची दृष्टी वाढवावी. परंतु असे करित असतांना कोणतेही संशोधन हे समाज, राष्ट्राच्या हिताचे असावे, त्याशिवाय ते शुन्य आहे, असे आवाहन कुलगुरूंनी याप्रसंगी सर्व विद्याथ्र्यांना केले.
संशोधन स्पर्धा प्रदर्शनीचे फित कापून उद्घाटन
नवसंशोधक विद्याथ्र्यांच्या मॉडेल्सचे सादरीकरण पाहुन मान्यवरांनी केली प्रशंसा
नवसंशोधक विद्याथ्र्यांनी आपल्या नवनवीन कल्पनांना आकार देवून तयार केलेल्या मॉडेल्सचे भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये सादरीकरण करण्यात आले. जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन केले. यावेळी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड आदींनी विद्याथ्र्यांच्या मॉडेल्सची पाहणी करुन त्यांच्याशी संवाद साधत नवसंशोधक विद्याथ्र्यांची प्रशंसा केली. तसेच विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सच्या उपयोगिततेबाबत माहिती घेतली.
माता सरस्वती, संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, दीपप्रज्वलन करुन राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन प्रा. मेघा कोटक, स्वागतपर भाषण व पाहुण्यांचा परिचय डॉ. नीरज घनवटे यांनी करुन दिला. प्रास्ताविकामधून आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. आभार डॉ. सुजाता काळे यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, पाचही जिल्ह्रांमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



