AmravatiLatest Newspolitics

नामांकनाचा आज शेवटचा दिवस; युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण

महानगरपालिका निवडणुकीसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने अमरावतीतील राजापेठ येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीकडून अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा आणि पक्षाच्या नेत्या सुनील राणा यांच्या हस्ते उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामांकन अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत असल्यामुळे पक्ष कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारांनी तातडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामांकन अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

युवा स्वाभिमान पार्टी सर्व प्रभागांमध्ये सक्षम आणि लोकाभिमुख उमेदवार मैदानात उतरवत असल्याचा विश्वास पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी ताकदीने आणि स्वबळावर लढणार असल्याचे संकेत या एबी फॉर्म वितरणातून स्पष्ट झाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button