AmravatiHelth CareLatest News

विद्याथ्र्यांनो! मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सांभाळा – कुलगुरू…. विद्यापीठात फिटनेस वीकचे कुलगुरूंच्याहस्ते उद्घाटन

अमरावती (दि. 29.12.2025) – आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकविणे सर्वांचे प्रथम कर्तव्य झाले आहे. स्पर्धेला सामोरे जातांना विद्याथ्र्यांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ नये, तो निरोगी आणि सुदृढ रहावा, म्हणून विद्यापीठाच्यावतीने फिटनेस कॅम्पचे केलेले आयोजन आजची गरज असून विद्याथ्र्यांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सांभाळावे आणि फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनात्मक प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने सहा दिवसीय शारीरिक कार्यक्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून  त्याचे उद्घाटनप्रसंगी कुलगुरू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री प्रकाश मेश्राम, फिट इंडियाचे श्री उज्ज्वल जाधव, पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत. उपस्थित होते.
                फित कापून फिटनेस वीकचे उद्घाटन झाल्याची घोषणा कुलगुरू यांनी केली. मार्गदर्शन करतांना कुलगुरू पुढे म्हणाले, आजच्या युगात करिअर घडविण्याच्या आणि पैसे कमविण्याच्या मागे धावतांना आरोग्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. शुगर व बी.पी.च्या रुग्णांमध्ये मोठ¬ा प्रमाणावर होत असलेल्या वाढीमुळे भारत भारत कॅपिटल होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. तरुणांमध्ये सुध्दा हे आजार पसरत असून ते चिंताजनक आहे. तरी सर्वांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी अशाप्रकारच्या फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक क्षमता तपासून घ्यावी असे आवाहन करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री प्रकाश मेश्राम म्हणाले, प्रत्येकाने फक्त स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देवून चालणार नाही, तर आरोग्य दूत म्हणून निरोगी आरोग्याचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. तरच या फिटनेस कॅम्पचे उद्दिष्ट ख-या अर्थाने यशस्वी होईल.
                  यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी प्रत्यक्ष चाचणी केंद्राची पाहणी केली व स्वत: शारीरिक चाचणी करुन घेतली. 3 जानेवारी पर्यंत चालणा-या या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये बी.एम.आय., स्टॅबिलिटी, ग्रीप स्ट्रेंग्थ, स्ट्रेंग्थ एन्ड¬ुरन्स, रियाक्शन टाईम, फॅट पर्सेंटेज, व्ही.ओ.2 मॅक्स, एक्झॅल कॅपेसिटी, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबीन, फ्लेक्झिबिलीटी, फिंगर डेक्स्टेरिटी, फोर्टी यार्ड शटल रन, हँड-आय-को-ऑर्डीनेशन, फुट-आय-को-ऑर्डीनेशन,होल बॉडी को-ऑर्डीनेशन, मेमरी स्कोप अशा चाचणी करण्यात येणार आहेत. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षकांकरिता ही चाचणी नि:शुल्क असून सर्वांनी आपली शारीरिक क्षमता चाचणी करुन घ्यावी, अशी विनंती पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी प्रास्ताविकेतून केली व आयोजनामागील भूमिका मांडली. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालन निखिलकुमार डोंंगरे, अमिता डुंग डुंग व मुशरफ अली, तर आभार रोजा गुरुंग हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अनुल बिजवे, डॉ. विजय निमकर, डॉ. निलेश इंगोले, डॉ. सौरभ त्रिपाठी, कु. सविता बावनथडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण विभागातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या विद्याथ्र्यांनी अथक परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button