दक्षिण पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग (पुरूष व महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 29.12.2025)- सागे युनिव्र्हसिटी, भोपाळ येथे 13 ते 15 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या दक्षिण पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग (पुरूष) व 10 ते 11 जानेवारी दरम्यान वेटलिफ्टिंग (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
पुरुष संघ (वेटलिÏफ्टग
चमूंमध्ये कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाचा अनुराग मौर्य व कार्तिक मिश्रा, जनता कला वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरचा गौरव कुरवाडे, आदित्य भालशंकर व सचिन राणे, विनायक विद्यामंदिर महाविद्यालय, अमरावतीचा सुमित देवतळे, स्व. कु. अर्चनाताई चव्हाण महाविद्यालय, कोंडाळाचा कार्तिक ढेंगळे, श्री विठ्ठल रुख्मिनी महाविद्यालय, सावनाचा फैजान खान याचा समावेश आहे.
महिला संघ (वेटलिÏफ्टग
चमूंमध्ये नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेराची कु. श्रेया वलिवकर, जनता कला वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरची कु. पुजा कल्याणकर, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. वैष्णवी पांडे, कला व वाणिज्य महाविद्यालय, येवदाची कु. अंजली इंगोले, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावतीची कु. नेहा कलोसिया, श्री विठ्ठल रुख्मिनी महाविद्यालय, सावनाची कु. साक्षी बुरकुले व कला व वाणिज्य महाविद्यालय, कु-हाची कु. वंशिका बोडोले हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. पुरुष चमूंचा प्रशिक्षण वर्ग सिताबाई कला व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे दि. 31 डिसेंबर, 2025 ते 09 जानेवारी 2026 दरम्यान पुरुष व महिला चमूंचा प्रशिक्षण वर्ग दि. 01 ते 07 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



