“डॉ.पंजाबराव देशमुख यांची शैक्षणिक क्रांती ऐतिहासिक “- प्रा.अरुण बुंदेले

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात डॉ.पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त प्रा.बुंदेले यांचे व्याख्यान संपन्न
डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणाच्या क्षेत्रात केलेली क्रांती ऐतिहासिक आहे.त्यांनी गरीब, कष्टकरी आणि शेतकरी वर्गातील मुलांसाठी शिक्षणाची द्वारे श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून खुली केली.खेड्यातील गरीब मुले शहरात येऊन शिक्षण घेण्यासाठी वसतीगृह स्थापन केले.त्यांनी शेतीला विज्ञानाची जोड देऊन कृषी क्षेत्रात फार मोठी क्रांती केली.”असे विचार समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, फ्रेजरपुरा,अमरावती येथे दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते. जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खरबडे मॅडम, प्रमुख वक्ते साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले,प्रमुख पाहुणे प्रा.कंठाळे मॅडम (पी.आर.पोटे बी.एड महाविद्यालय) होत्या. अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांनी शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
सर्वप्रथम प्रा.अरुण बुंदेले यांनी “भाऊसाहेब ” या स्वरचित वंदनगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी प्रा.अरुण बुंदेले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना भाऊसाहेब जयंतीनिमित्त्त नोटबुकं सस्नेह भेट दिले.
अध्यक्षीय भाषणातून श्रीमती खरबडे मॅडम यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचाराची आज गरज असल्याचे प्रतिपादन केले.प्रा.कंठाळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्री पवन गावंडे सर,प्रमुख वक्ते प्रा. अरुण बुंदेले यांचा परिचय श्री उमाळे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री गवई सर यांनी केले. कार्यक्रमाला श्री शेंडे सर, राठोड सर , सोळंके सर ,माथने सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाला पीआर पोटे बी.एड. महाविद्यालयातील नेहा महाजन या प्रशिक्षणार्थीने तयार केलेल्या शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या रंगीत पोस्टरचे विमोचन प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पी आर पोटे बी.एड. महाविद्यालयातील अभिषेक जावरकर,अलफिया खान,आखनी शेताके, फरिन जावेद अली,गौरव सातव,गौरीका खंडारे,कामेश जयस्वा, नूरनॉहन पठाण, सायमा अब्दूल,सुमित गांगरे,त्रिवेणी कारेकर,कल्याणी काळबांडे, कोमल जिरापूरे हे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.



