अ.भा. आंतर विद्यापीठ अॅथलेटिक्स (पुरूष व महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 29.12.2025)- राजीव गांधी युनिव्र्हसिटी ऑफ हेल्थ सायन्स, कर्नाटक येथे 12 ते 16 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अॅथलेटिक्स (पुरूष व महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
पुरुष संघ (अॅथलेटिक्स)
चमूंमध्ये बॅरि. आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेराचा वैभव गवळी, स्वराज भोपाळे, नितीन हिवराळे, पार्थ सावरकर, आदिराज पाटील, रितेश लोणे, संकेत वायाळ, विकास वाघ व कुणाल चौधरी, कला व वाणिज्य महाविद्यालय, जरूडचा राहुल गवई, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा रिचर्ड ब्रॉन, हर्ष मोहन व रौनक दुबे, दयाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळचा सोहम झाटे, जे.बी. आर्टस् महाविद्यालय, चन्नी पातुरचा कृष्णकांत राखोंडे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा रेवण क्षीरसागर, एस.सी.पी.ई., अमरावतीचा मुन्सिफ शेख, श्री शिवाजी महाविद्यालय, चिखलीचा वैभव बरडे याचा समावेश आहे.
महिला संघ (अॅथलेटिक्स)
चमूंमध्ये मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणाची कु. पुनम बंगाळे, बी.एस. पटेल महाविद्यालय, पिंपळगांव काळेची कु. नेहा जाधव व कु. दिव्या जाधव, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. प्रियांका कुंडू, बॅरि. आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेराची कु. वैष्णवी लवाळे, श्रीमती एस.आर. मोहता महिला महाविद्यालय, खामगांवची कु. प्रणाली शेगोकार आणि गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शीटाकळीची कु. नंदिनी गायकवाड हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. पुरुष व महिला चमूंचा प्रशिक्षण वर्ग डी.सी.पी.ई., अमरावती येथे दि. 31 डिसेंबर, 2025 ते 09 जानेवारी 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



