Latest NewsMaharashtra

मालेगाव–भेरा रोडवरील मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका

संत गुणवंत बाबा संस्थानजवळील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

मालेगाव ते भेरा रोडवरील संत गुणवंत बाबा संस्थानजवळील मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भेरा येथील ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.

हा रस्ता जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथे जाणारा महत्त्वाचा अंतर्गत मार्ग आहे. या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच रस्त्याचा वापर शाळकरी मुलेही करीत असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली असून, खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी तो दिसून येत नाही. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा खड्डा जीवघेणा ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही या ठिकाणी किरकोळ अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर भेरा येथील नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी संबंधित बांधकाम विभाग व प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button