विद्याथ्र्यांनी मूल्यांची जपवणूक व कर्तव्यांची जाणीव ठेवावी – डॉ. मनिषा कोडापे .. विद्यापीठात वीर बाल दिवसाचे आयोजन

अमरावती – (दि. 26.12.2025) : इतिहास हा भावी पिढीला दिशादर्शक असतो. इतिहासातून आपण काय घेतले पाहिजे, हे महत्वाचे असून विद्याथ्र्यांनी यशस्वी होण्याकरीता मूल्यांची जपवणूक आणि आपल्या कर्तव्यांची जाणीव या गोष्टींना आपल्या जीवनात सर्वोच्च महत्व दिले पाहिजे. पालकांनी आपले पाल्य संस्कारक्षम कसे होतील, या उद्देशाने त्यांना शिक्षित करावे, असे प्रतिपादन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे यांनी व्यक्त केले. शीख धर्माचे दहावे गुरू गोविंद यांचे सुपूत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंहजी आणि साहिबजादा बाबा फतेह सिंहजी यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभर वीर बाल दिवस संपन्न होतो. त्यानिमित्ताने विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग आणि ज्ञानरुाोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ज्ञानरुाोत केंद्राच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील व विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते.
डॉ. मनिषा कोडापे पुढे म्हणाल्या, आजच्या पिढीला सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. पालकसुद्धा आपल्या मुलांची अधिक जास्त काळजी घेतात, असे असले तरी, मुलांनी सोशल मिडीयाचा योग्य मूल्यांसाठी वापर करावा. त्यांनी चांगले ज्ञान संपादित करुन आपले करिअर घडवावे व देशाच्या विकासासाठी सदैव तयार रहावे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, औरंगजेबने केलेल्या अन्यायाला शीख समुदयाने समर्थपणे तोंड दिले. शीख समुदायाने मोठा इतिहास घडविला असून आजच्या विद्याथ्र्यांनी वीर बालकांपासून प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वैशाली गुडधे म्हणाल्या, 22 डिसेंबर, 2022 पासून वीर बाल दिवस हा कार्यक्रम सुरु झाला आहे. साहिबजादा बाबा जोरावर सिंहजी आणि साहिबजादा बाबा फतेह सिंहजी हे मृत्युमुखी पडले, त्यांची देशभक्ती त्यातून दिसून येते. पालकांसाठी सुद्धा ही घटना महत्वाची असून आपल्या मुलांना कशाप्रकारे संस्कार व मूल्ये द्यावीत, याचा बोध या घटनेतून मिळतो. यावेळी छत्रपती संभाजी महाराज आणि कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
सुरुवातीला कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी साहिबजादा बाबा जोरावर सिंहजी आणि साहिबजादा बाबा फतेह सिंहजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी, तर आभार श्री विशाल बापते यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



