प्राप्ती मारोडकर चा विजय हि कार्याची पावती…..अनंतराव गुढे

अमरावती : नांदगाव खंडेश्वर नगरपरिषदेची निवडणुकीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अध्यक्ष पदी सौ. प्राप्ती विलास मारोडकर व प्रकाश मारोडकर सह सत्ता प्राप्त केली. हि निवडणूक प्रकाश मारोडकर यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या कामाची पावती होती. गेल्या दहा वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर येथील शिवसेना प्रकाश मारोडकर याच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, अधिकाऱ्यांची अरेरावी, सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन सतत लढत होती. त्यामुळे जन्मानसात शिवसेना आणि प्रकाश मारोडकर यांच्या विषयी प्रचंड सहकार्यांची भावना मला दिसत होती.
माझा नांदगाव खंडेश्वर तालुक्याशी संबंध आहे. या निवडणुकीत शिवसेनेचेचे सर्व जुने जाणते शिवसैनिक जीवापार मेहनत घेत होते. प्रकाश मारोडाकार याने केलेल्या कार्य- कर्तृत्वाचा आदर प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात होता. मारोडकर हे अतिशय गरीब कुटुंब आहे. शेती नाही, मोठा व्यवसाय नाही, घरात कोणालाच सरकारी नोकरी नाही., कोणताही राजकीय वारसा नाही. अश्या विपरीत परिथितीत आम्ही हि निवडणूक लढविली आणि जिकली.
एकीकडे प्रचंड पैश्याचा मारा , काँग्रेस आमच्या सोबत नव्हती.आमच्या पक्षाची एकही सभा नाही., कि कोणाचीही वरून मदत नाही. शिवसेनेचे सर्व सामान्य शिवसैनिकांनी हि निवडणूक स्वतःच्या अंगावर घेतली. माझ्या लोकसभा निवडणुकीत असणारे शिवसैनिक आजही आहेत. ते सत्तेच्या किंवा पैश्याच्या लालसे पाई कधीही बदलले नाहीत. मला याचा अभिमान आहे. आजही ते माझ्या नेतृत्वात काम करतात. त्यांच्या अथक मेहनतीच हे यश आहे. मी जर नाव लिहीत बसलो, तर हि बातमी खुप मोठी होईल. म्हणून त्या तमाम निष्ठावान शिवसैनिकांना मी मनाचा मुजरा करतो.



