पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ लॉन टेनिस (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 26.12.2025)- संजय घोडावत युनिव्र्हसिटी, कोल्हापूर येथे 06 ते 11 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ लॉन टेनिस (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा प्रोमित बोरडोलोई व बिस्वज्योती बर्मन, बी.आर. आर्टस् एन.बी. कॉमर्स अॅन्ड बी.पी. सायन्स कॉलेज, दिग्रसचा विवेक मस्के, पी.आर. पोटे (पाटील) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावतीचा अपुर्व डहाके, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा अंशुल खंडतकर, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अमरावतीचा अमेय पोटे व भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा सोमेश विटाळकर याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग अॅडव्हान्स टेनिक अॅकेडमी, बापु कॉलनी, दीपनगर, अमरावती येथे दि. 26 डिसेंबर, 2025 ते 04 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



