पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉकी (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 26.12.2025)- एल.एन.सी.टी. युनिव्र्हसिटी, भोपाळ येथे 12 ते 17 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉकी (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा काझी बिलालुद्दीन, अम्मर यासीर, मोहम्मद हाशीर, मोहम्मद अकिब व सयीद मलिक, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा विकास परमार, दयाल मल्लिक, प्रणव शर्मा व ज्ञानेंद्र प्रताप, राजश्री शाहु विज्ञान महाविद्यालय, चांदुररेल्वेचा झहिद खान, माझ जिशान व सयीद झैनुलाबेदीन, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा मोहम्मद शोएब, मोहम्मद अनस शाह, मोहम्मद उजैर, शेख अर्शद, फरान अहेमद, मोहम्मद उजैफ, समीर खान व अरबाज खान, गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शिटाकळीचा रोहीद दंडाळे, श्रीमती नानकीबाई वाधवाणी महाविद्यालय, यवतमाळचा विकी गिरी, कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरबचा प्रथमेश ठोकळ याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 31 डिसेंबर, 2025 ते 09 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



