AmravatiEducation NewsLatest News

सौ. स्वप्ना यावले लिखित ‘वेदांचा सामान्य परिचय’ पुस्तकाचे विमोचन

अमरावती :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विभागात नुकत्याच पार पडलेल्या संस्कृत भारतीच्या संगोष्ठीमध्ये सौ. स्वप्ना प्रशांत यावले लिखित ‘वेदांचा सामान्य परिचय’ या प्रथम पुस्तकाचे संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख श्री श्रीश देवपुजारी, विदर्भ प्रांताचे प्रांत प्रचारप्रमुख श्री देवदत्त कुळकर्णी यांचे हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी संस्कृत विभागाच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख, अॅड. प्रशांत यावले, डॉ. राहुल लोधा, प्रा. श्वेता बडगुजर, प्रा. प्रियंका मोहोड, प्रा. आकाश हरणे, प्रा. मोरेश्वर वेखंडे आदी उपस्थित होते.
               दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्कृत भाषेतील निरनिराळ्या पैलूंवर झालेल्या चर्चेदरम्यान श्री. श्रीश देवपुजारी यांनी संस्कृत भाषेची गहनता विषद केली. पुस्तकासाठी ऋतुराज यावले यांचे तांत्रिक सहाय्य लाभले, त्याबद्दल प्रा. स्वप्ना यावले यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली व उपस्थितांचे आभार मानले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button