विद्यापीठातील संस्कृत विभागाचे दोन विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या विद्याथ्र्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम व द्वितीय येण्याचा मान पटकावून विद्यापीठाचे तसेच संस्कृत विभागाचे नाव उंचावले. अमृता कोरडे प्रथम, तर डॉ.राजीव मुलमुले यांनी व्दितीय स्थान प्राप्त केले.
‘असाध्य ते साध्य करीसी कारण सायास तुका म्हणे’ या ओवी प्रमाणे दोन्ही विद्याथ्र्यांनी जिद्द, चिकाटी व प्रचंड मेहनत करून दाखवून दिले आहे. विद्याथ्र्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विभागाच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख, प्रा. डॉ. राहुल लोधा, प्रा. स्वप्ना यावले, प्रा. श्वेता बडगुजर, प्रा.प्रियंका गावंडे, प्रा. आकाश हरणे, तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
आईवडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांनी दिलेले अध्ययनाचे धडे व विद्यापीठातील समृध्द ग्रंथालय यामुळे हे यश प्राप्त करू शकलो, असे याप्रसंगी विद्याथ्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



