सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; आज 10 ग्रॅम सोन्याचा दर काय?

सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या दरांनी अक्षरशः गगनाला भिडले असून, सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत असल्याचं चित्र आहे. अशातच आज, बुधवार (24 डिसेंबर 2025) रोजी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय बदल नोंदवण्यात आला आहे.
आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून, चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं लक्ष सराफा बाजाराकडे लागलं आहे.
आजचे देशातील सोन्या-चांदीचे नवीन दर
(बुलियन मार्केटनुसार)
- 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं: ₹1,38,690
- 10 ग्रॅम 22 कॅरेट सोनं: ₹1,27,133
- 1 किलो चांदी: ₹2,23,600
- 10 ग्रॅम चांदी: ₹2,226
उत्पादन शुल्क, राज्य सरकारचा कर (GST) तसेच मेकिंग चार्ज यांमुळे सोन्याच्या दागिन्यांचे दर राज्यागणिक आणि शहरानुसार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील दर तपासणं आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील आजचा सोन्याचा भाव
मुंबई
- 22 कॅरेट (10 ग्रॅम): ₹1,26,903
- 24 कॅरेट (10 ग्रॅम): ₹1,38,440
पुणे
- 22 कॅरेट (10 ग्रॅम): ₹1,26,903
- 24 कॅरेट (10 ग्रॅम): ₹1,38,440
नागपूर
- 22 कॅरेट (10 ग्रॅम): ₹1,26,903
- 24 कॅरेट (10 ग्रॅम): ₹1,38,440
नाशिक
- 22 कॅरेट (10 ग्रॅम): ₹1,26,903
- 24 कॅरेट (10 ग्रॅम): ₹1,38,440
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय फरक असतो?
सोने खरेदी करताना अनेकदा ग्राहकांना विचारलं जातं की 22 कॅरेट की 24 कॅरेट सोनं हवं आहे?
- 24 कॅरेट सोने सुमारे 99.9 टक्के शुद्ध असतं. मात्र हे सोने खूप मऊ असल्यामुळे त्याचे दागिने बनवता येत नाहीत.
- 22 कॅरेट सोने सुमारे 91 टक्के शुद्ध असतं. उर्वरित 9 टक्क्यांमध्ये तांबे, चांदी किंवा जस्त यांसारख्या धातूंचं मिश्रण असतं, ज्यामुळे दागिने अधिक टिकाऊ बनतात.
म्हणूनच बाजारात प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचे दागिने विक्रीसाठी उपलब्ध असतात.



