पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बॅडमिंटन (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 23.12.2025) – आय.टी.एम. युनिव्र्हसिटी, ग्वालियर येथे 06 ते 11 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बॅडमिंटन (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा सौम्यादीप सहा, जी.एस. महाविद्यालय, खामगांवचा अर्नव निंबाळकर, सार्थक काटकर, रुद्र कचरे व पवन वानरे, इंदिरा महाविद्यालय, कळंबचा मयूर वाळगुंजे, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा पार्थ गाला व एस.एस.जी.एम.सी.ई. शेगांवचा रुद्रेश लटारे याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 25 डिसेंबर, 2025 ते 03 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



