AmravatiEducation NewsLatest News

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती निमित्त ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे’ 23 डिसेंबर रोजी आयोजन

डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था यांचा संयुक्त उपक्रम

अमरावती – (दि. 22/12/2025) – शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 डिसेंबर, 2025 रोजी सायं. 5.00 वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, अमरावती याठिकाणी ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

                 व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते उपस्थित राहतील.   व्याख्यानमालेकरीता ‘ग्रामीण भारतातील सद्य:स्थिती व आव्हाने’ हा विषय निवडण्यात असून नागपूर येथील प्रसिद्ध अभ्यासक व मुक्त पत्रकार श्री जयदीप हर्डीकर हे व्याख्यानातून अभ्यासपूर्ण मांडणी करणार आहेत. ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांचे सखोल जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे.
तरी सर्वांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमालेला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button