AmravatiLatest NewsSocial News

अमरावतीच्या दादासाहेब गवई स्मारकाची पर्यटकांना भुरळ; नागरिकांची सुटीच्या दिवशी सहकुटुंब भेटी

अमरावती: विदर्भाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारे स्व. रा. सू. ( दादासाहेब) गवई स्मारक’ सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. विशेषतः सुटीच्या दिवशी आणि संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी नागरिकांची मोठी भुरळ पाहायला मिळत असून, सहकुटुंब भेटी देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
लोकार्पणानंतर पर्यटकांचा ओघ वाढला असून भव्य लोकार्पणानंतर, हे स्मारक अवघ्या काही दिवसांतच अमरावतीकरांचे लाडके ठिकाण बनले आहे. विद्यापीठ परिसरातील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात असलेले हे स्मारक केवळ एक वास्तू राहिली नसून, ती आता एक कौटुंबिक सहलीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे.

कुटुंबीयांसाठी आकर्षणाची केंद्रबिंदू

भव्य पुतळा आणि निसर्गरम्य परिसर: स्मारकाच्या दर्शनी भागात असलेला दादासाहेबांचा १५ फूट उंच पूर्णाकृती पुतळा आणि त्याभोवतीची आकर्षक रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अत्याधुनिक एआय गॅलरी: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्मारकातील एआय आधारित डिजिटल गॅलरीची भुरळ पडली आहे. ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून दादासाहेबांचा जीवनप्रवास पाहण्यासाठी नागरिकांची आतुरता वाढत आहेत.
नयनरम्य उद्यान: स्मारकाचा बाहेरील परिसर अत्यंत सुंदररीत्या सुशोभित करण्यात आला असल्याने, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी हे हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण ठरत आहे.
 “नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद होतोय , दादासाहेबांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश सफल होताना दिसत आहे,” असे  स्मारकाचे संपदा व्यवस्थापक श्री धम्मदीप गवई कडून सांगण्यात आले.
अमरावतीकरांचे मत:
“स्मारकाची वास्तू अतिशय भव्य आहे. इथे आल्यावर केवळ माहिती मिळत नाही, तर मनाला शांतीही मिळते. मुलांसाठी तर ही एक ऐतिहासिक शाळाच आहे,” अशी प्रतिक्रिया एका भेट देणाऱ्या पालकाने दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button