Latest NewsMaharashtra

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनताई पाटील यांचे दुःखद निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनताई पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात असून अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील 24 नगरपरिषदा, नगर पंचायती आणि एकूण 154 सदस्यपदांसाठी आज मतदान पार पडत आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुतीतून लढणार

कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रच लढवण्यावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत एकमत झाले आहे. या निर्णयामुळे महायुतीची ताकद अधिक बळकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाण्यात उमेदवारीसाठी मोठी चुरस

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेकडून 3,348 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय असून 1,548 महिलांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत, त्यामुळे पक्षांतर्गत चुरस वाढली आहे.

मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात आज सुनावणी

मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी बावधन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची पोलीस कोठडी आज संपत असून, त्यांना पौड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे शालिनताई पाटील यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button