Latest NewsMaharashtra Politics

दाट धुक्यामुळे पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने उतरू शकले नाहीत; ताहेरपूर सभेला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील ताहेरपूर येथे आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. दाट धुक्यामुळे पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर ताहेरपूर हेलिपॅडवर उतरू न शकल्याने ते कोलकाता विमानतळावर परतले.

शनिवारी (20 डिसेंबर 2025) सकाळी खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर लँडिंग करणे धोकादायक ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राणाघाट येथील ताहेरपूर नेताजी पार्कमधील जाहीर सभेला दूरध्वनी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.

सभेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले,
बंगालच्या नादिया येथे मी प्रत्यक्ष पोहोचू शकलो नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खराब हवामानामुळे माझा कार्यक्रम बदलावा लागला.”

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील जनतेचे आभार मानत विकास, केंद्र सरकारच्या योजना आणि भविष्यातील कार्यदिशेबाबत आपले विचार मांडले. सभास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

खराब हवामानामुळे कार्यक्रमात बदल झाला असला तरी, पंतप्रधानांच्या संबोधनासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारी घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button