AmravatiLatest NewsSports

अ.भा. आंतर विद्यापीठ कुस्ती (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 20.12.2025) – चंदिगड युनिव्र्हसिटी, मोहाली (पंजाब) येथे  05 ते 09 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती फ्रि स्टाईल व ग्रीको रोमन स्टाईल (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.

फ्रि स्टाईल
चमूंमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, आसेगांव पूर्णाचा अर्जून यादव व आदम खान, संत भगवानबाबा कला महाविद्यालय, सिंदखेड राजाचा ओंकार मोरे, बी.एन.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुसदचा ओंकार पवार, युवाशक्ती शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा अतुल, श्री विठ्ठल रुख्मिणी कला व वाणिज्य महाविद्यालय, सावनाचा अमोल चव्हाण, मातोश्री एस. गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाशिमचा मोहंमद मिरान, प्रवीण वाकोडे व साहील शेख, श्री गणेश कला महाविद्यालय, कुंभारीचा सुमित गवई, एम.जे.एफ. अॅन्ड विठ्ठलराव राऊत महाविद्यालय, भातकुलीचा गणेश कोळेकर, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाचा गौतम सिरसाट व स्व. सी.एम. कढी कला महाविद्यालय, परतवाडाचा रोशन मोहोड याचा समावेश आहे.

ग्रीको रोमन स्टाईल
चमूंमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा मोहन तोरकर, नामदेव बुरकुळे व अनुज सारवान, भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा करण यादव व अंकित यादव, शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगांवचा अभिषेक दाबेराव, संत भगवानबाबा कला महाविद्यालय, सिंदखेड राजाचा  रामे·ार वाघ, स्व. भाष्करराव शिंगणे कला महाविद्यालय, साखरखेडाचा शुभम गट्टे, स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोडचा झिया खान, ज्ञानराज माऊली कला व विज्ञान महाविद्यालय, टोमाळा (वाशिम) चा करण महल्ले, श्री के.एन. गोयनका महाविद्यालय, कारंजा लाडचा तौफिक नवरंगाबादी, फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसदचा तेजस अंतगाडे आणि स्व. कु. अर्चनाताई चव्हाण कला, वाणिज्य, श्री मनोहरराव नाईक महाविद्यालय, कोंडाळाचा धिरज मेटकर याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 24 डिसेंबर, 2025 ते 02 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button