Education NewsLatest News

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणीचे आवाहन

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती व गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक नोंदणी करून माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक, मुंबई शहर – रविकिरण पाटील यांनी केले आहे.

शाळांसाठी नोंदणी अनिवार्य

या योजनेसाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी संकेतस्थळ –
👉 https://prematric.mahait.org/Login/Login

प्री-मॅट्रिक योजनांसाठी लॉगिन करताना

  • User ID: Pre_SE27XXXXXXXXX_Principal
  • Password: Pass@123

लॉगिननंतर शाळेचे प्रोफाइल, मुख्याध्यापक व लिपिकांची माहिती तसेच विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक

विद्यार्थी ज्या शिष्यवृत्ती योजनेस पात्र आहेत, त्या योजनेसाठी स्वतंत्रपणे अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचणी उद्भवल्यास संबंधितांनी लेखी स्वरूपात कळवावे अथवा खालील ई-मेलवर संपर्क साधावा.

📧 ई-मेल: astdirmumcityvint@gmail.com

एकही विद्यार्थी वंचित राहू नये

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्याध्यापक व शाळा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सहकार्य करावे.
एकही पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button