Accident NewsAmaravti GraminLatest NewsMaharashtra

तिवसा तहसीलजवळ कालव्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

आनंदवाडी परिसरात हळहळ; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अमरावती, दि. — :
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसीलजवळ असलेल्या आनंदवाडी परिसरात कालव्यात वाहून गेलेल्या एका तरुणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव ओम अरविंद सहारे (वय 21) असे असून, तो काल कालव्याच्या काठावर पाय धुण्यासाठी गेला असता अचानक त्याचा तोल गेला. कालव्यातील जोरदार प्रवाहामुळे तो पाण्यात वाहून गेला.

घटनेची माहिती मिळताच डीडीआरएफचे पथक, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काल रात्री उशिरापर्यंत तसेच आज सकाळपर्यंत कालव्यात शोधमोहीम सुरू होती. अखेर आज सकाळी आनंदवाडीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कालव्यात ओम सहारे याचा मृतदेह आढळून आला.

या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button